20 January 2021

News Flash

नायजेरियात लॉकडाउनचे नियम तोडणाऱ्या १८ जणांचा पोलिसांकडून एन्काऊंटर, मानवाधिकार आयोगाच्या रिपोर्टने खळबळ

करोनापेक्षाही पोलिसांच्या गोळीबारात जास्त मृत्यू झाले आहेत

(Photo Courtesy: AFP)

करोनामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून त्याची काटेकोरपणे अमलबजावणी केली जावी यासाठी पोलिसांचा फौजफाटा रस्त्यांवर तैनात करण्यात आला आहे. नायजेरियातही लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून येथे पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या १८ जणांची हत्या केल्याचं समोर आलं आहे.  महत्त्वाचं म्हणजे हा आकडा करोनामुळे देशात मृत्यू झालेल्यांपेक्षाही जास्त असल्याचं मानवाधिकार आयोगाने सांगितलं आहे.

मानवाधिकार आयोगाने आपल्याकडे लोकांनी फोन करुन तसंच व्हिडीओ पाठवून या हत्यांची माहिती दिली असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार, ३० मार्चपासून लॉकडाउन सुरु झाल्यापासून पोलिसांनी १८ जणांची हत्या केली आहे. तर आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, करोनामुळे देशात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

नायजेरियात करोनाचे एकूण ४०७ रुग्ण आढळले असून व्हायरस अजून वेगाने पसरण्याची भीती आहे. नायजेरियन पोलिसांची प्रतिमा क्रूर अशीच मलिन आहे. काऊन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्सने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक वर्षात संपूर्ण देशभरात १४७६ जणांची हत्या करण्यात आली आहे.

मानवाधिकार आयोगाने आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, आठ वेगवेगळ्या घटनांमध्ये १८ जणांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. आयोगाने आपल्याला ३६ पैकी ४२ राज्यांमधून जवळपास १०० तक्रारी आल्या असल्याचं सांगितलं आहे. मानवाधिकार आयोगाच्या अहवालावर अद्याप सुरक्षा दलाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 9:34 am

Web Title: coronavirus lockdown nigerian security forces kill 18 people sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 कामावर येऊ नको सांगितले असतानाही कामावर गेलेल्या कर्मचाऱ्याच्या तोंडावर बॉसनेच मारला बुक्का
2 भारतात २४ नमुन्यांमागे एक रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह
3 तबलिगी जमातच्या प्रमुखावर ईडीकडून गुन्हा दाखल, परदेशातून मिळणारी आर्थिक मदत लपवल्याचा संशय
Just Now!
X