08 March 2021

News Flash

“महाराष्ट्रात आढळलेला करोनाचा नवा स्ट्रेन जास्त घातक”

'एम्स'चे संचालक गुलेरिया यांचा इशारा; देशात आढळले २४० नवीन स्ट्रेन

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: रॉयटर्स)

महाराष्ट्रात करोना पुन्हा एकदा थैमान घालण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत करोनाचा प्रसार वाढला असून, रुग्णसंख्येचा वेगही वाढल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. दरम्यान, या संकटाबरोबर चिंता वाढवणारी एक बाब समोर आली आहे. देशात २४० नवीन करोना स्ट्रेन आढळून आले आहेत. यात महाराष्ट्रात आढळून आलेल्या करोनाच्या नवा स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो, असा इशारा दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. या नवीन स्ट्रेनचा अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या लोकांनाही संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. देशात करोनाचे २४० नवी स्ट्रेन आढळून आले असून, महाराष्ट्रात आढळून आलेला स्ट्रेन जास्त घातक ठरू शकतो, असं ते यावेळी म्हणाले. “भारतात हर्ड इम्युनिटी ही कल्पनाच ठरणार आहे. कारण देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांमध्ये अॅण्टीबॉडीजची गरज आहे. महाराष्ट्रात आढळून आलेल्या नव्या करोना स्ट्रेनचा विचार केल्यास हे अवघड दिसत आहे. कारण या स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो. इतकंच काय तर ज्या नागरिकांमध्ये अॅण्टीबॉडीज विकसित झालेल्या आहेत. त्यांनाही याचा संसर्ग होऊ शकतो,” इशारा डॉ. गुलेरिया यांनी दिला.

आणखी वाचा- माझं कळकळीचं आवाहन की,…; राजेश टोपे यांचं रुग्णालयातून महाराष्ट्राला पत्र

हर्ड इम्युनिटीबद्दल बोलताना गुलेरिया म्हणाले,”म्युटेशन्समध्ये (विषाणूचं बदलेलं रुप) किंवा नवीन स्ट्रेनमध्ये प्रतिकार शक्तीपासून बचावाची क्षमता तयार झाली आहे. त्यामुळे लसीमुळे वा करोनातून बऱ्या झालेल्या आणि अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या माणसांनाही त्यापासून धोका होण्याची शक्यता आहे,” असा अंदाज गुलेरिया यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीही करोनाच्या उद्रेकाविषयी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. देशभरात करोनाचे २४० नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. त्यामुळेच करोनाच्या संसर्गाचा वेग वाढला असून, महाराष्ट्रातही मागील आठवड्यांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, असं जोशी यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 8:50 am

Web Title: coronavirus update new indian strains found in maharashtra could be highly transmissible and dangerous bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 इराकमध्ये रॉकेट हल्ला; अमेरिकन दुतावास होतं मुख्य टार्गेट
2 ‘ब्रिक्स’ यजमानपदासाठी भारताला चीनचा पाठिंबा
3 संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यास भारत वचनबद्ध
Just Now!
X