25 February 2021

News Flash

चिंताजनक! नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू

फायझरची लस घेतल्यानंतर नागरिकांना त्रास

संग्रहित छायाचित्र

एकीकडे करोना लसीमुळे आशादायी वातावरण तयार होत असताना नॉर्वेमध्ये काळजीत भर टाकणारं वृत्त समोर आलं आहे. नॉर्वेमध्ये करोना लसीकरणाला सुरूवात झाली असून, डिसेंबरच्या अखेरीपासून आतापर्यंत २५ हजाराहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र, चिंतेची बाब म्हणजे लस घेतल्यानंतर नॉर्वेत २९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे नॉर्वे सरकारसमोर नव्या संकट उभं ठाकलं आहे.

करोनाविरोधातील लढाई निर्णायक ठरणाऱ्या लस तयार करण्यात अनेक कंपन्यांना यश आलं आहे. अनेक देशांमध्ये लसींच्या आपत्कालीन वापरासाठीही परवानगी देण्यात आली असून, लसीकरण अभियानही सुरू करण्यात आलं आहे. याच दरम्यान, लसीकरण मोहीम राबवण्यात येत असलेल्या नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू झाला आहे. फायझर बायोएनटेकची लस घेतल्यानंतर या घटना घडल्या आहेत.

डिसेंबर २७ पासून नॉर्वेत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली असून, फायझर बायोएटेकची लस घेतल्यानंतर अनेकांना त्रास सुरू झाल्याचं समोर आलं. यात शनिवारी २९ नागरिकांचा लसीकरणानंतर मृत्यू झाला आहे. तर ७५ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

मृतांमध्ये ७५ ते ८० वयोगटातील वृद्ध नागरिकांचा समावेश आहे. बहुतांश मृत्यू हे गंभीर आजार असलेल्या नागरिकांचे झाले आहेत. लस घेतल्यानंतर या नागरिकांना उलटी, ताप यासारखा त्रास जाणवला होता. नॉर्वेमध्ये फायझर बायोएनटेक तयार केलेली लसच उपलब्ध झालेली आहे. लसीकरणानंतर झालेले मृत्यू या लसीशी संबंधितच आहे. १३ जणांच्या मृत्यूची चौकशी करण्यात आली असून, उर्वरित १६ जणांच्या मृत्यूचं कारण शोधलं जात आहे, असं नॉर्वे मेडिसीन यंत्रणेनं ब्लूमबर्गला माहिती देताना म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 11:46 am

Web Title: coronavirus vaccination update 29 dead in norway after getting vaccinated bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 भयावह! अपहरण… सामूहिक बलात्कार… पुन्हा अपहरण… अन् सामूहिक बलात्कार
2 “आम्ही थंडीने मरत आहोत आणि सरकार केवळ ‘तारीख पे तारीख’ देत आहे”
3 देशभरात मागील २४ तासांत १७ हजार १७० जण करोनामुक्त, १८१ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X