भारतात गेल्या काही दिवसांपासून उच्चांक नोंदवणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येत थोडा दिलासा मिळाला आहे. भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान २७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येत ४७.६७ टक्के रुग्ण हे पाच राज्यांमधील असून एकटा महाराष्ट्र १५.७ टक्के रुग्णसंख्येसाठी जबाबदार आहे.

महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी : एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण!

दरम्यान देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ इतकी झाली आहे. तर २७७१ मृत्यूंसोबत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ९७ हजार ८९४ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासांत २ लाख ५१ हजार ८२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून आतापर्यंत १ कोटी ४५ लाख ५६ हजार २०९ जणांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्याच्या घडीला २८ लाख ८२ हजार २०४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १४ कोटी ५२ लाख ७१ हजार १८६ जणांचं लसीकरण झालं आहे.

Corona: भारतात रुग्णसंख्येचा विस्फोट; साडे तीन लाखांहून अधिक रुग्ण तर २८१२ रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात दिवसभरात ७१ हजार ७३६ रूग्ण करोनामुक्त
महाराष्ट्रात सोमवारी ७१ हजार ७३६ रूग्ण करोनामुक्त झाले. राज्यात आजपर्यंत एकूण ३६,०१,७९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.९२ एवढे झाले आहे. याशिवाय सोमवारी राज्यात ४८ हजार ७०० नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात आज ५२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.