भारताची स्वदेशी लस कोव्हॅक्सिन ब्राझील व्हेरियंटच्या करोना विषाणूवरही प्रभावी असल्यादा वादा आयसीएमआरनं केला आहे. कोव्हॅक्सिन युके व्हेरियंट, B.1.1.7 आणि महाराष्ट्रातील B.1.617 वरही कार्यक्षम असल्याचं यापूर्वीच निष्पन्न झालं आहे. कोव्हॅक्सिन भारत बायोटेकनं आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून तयार केली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी आणि आयसीएमआरनं ब्राझील व्हेरियंट B.1.128.2 या करोना विषाणूवर सखोल अभ्यास केला. यासाठी त्यांनी कोव्हॅक्सिनचे दोन डोस एका विषाणूबाधित व्यक्तीला दिले होते. त्यानंतर त्या व्यक्तीमध्ये करोना विषाणूंशी लढण्याची क्षमता वाढल्याचं दिसून आलं. ब्राझील व्हेरियंटला यापूर्वी B.1.1.248 हे नावं देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यात बदल करत B.1.128.2 यात वर्गीकरण करण्यात आलं. हा व्हेरियंट पी १ आणि पी २ प्रकारातील असल्याचं मान्य केलं होतं. मात्र आता आता हा विषाणू एकाच प्रकारचा असल्याचं समोर आलं आहे. हा विषाणू ब्राझील आणि जगातील इतर भागात पसरला आहे.

कोव्हॅक्सिन ही लस रासायनिक प्रक्रिया केलेल्या करोना विषाणू नमुन्यापासून तयार केली असून त्यामुळे या विषाणूंची संख्या शरीरात वाढत नाही. दोन मात्रा तीन आठवडय़ांच्या अंतराने दिली असता लसीतील विषाणू प्रथिने क्रियाशील बनून प्रतिकारशक्ती वाढवतात व पुढील संसर्गाला तोंड देण्यास शरीराला सज्ज करतात.

देशात संपूर्ण लॉकडाउन?; टास्क फोर्सने केंद्र सरकारला दिला सल्ला

कोव्हॅक्सिन लसीच्या कार्यक्षमतेचा अभ्यासपूर्ण अहवाल प्रीपिंट सर्व्हर बायोआरस्किव्हमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. भारताची स्वदेशी लस म्हणून मान्यता पावलेली भारत बायोटेकची कोविड १९ प्रतिबंधक लस सुरक्षित असून प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे. त्याचे कुठलेही विपरित सहपरिणाम होत नाहीत, असा शिक्कामोर्तब लॅन्सेट इनफेक्शियस डिसिजेस जर्नलने यापूर्वीच केला आहे.