21 January 2021

News Flash

कोविड-19 वॅक्सीनमुळे तुम्ही नपुंसकही होऊ शकता, काहीपण होऊ शकतं – आशुतोष सिन्हा

अखिलेश यादव यांच्यानंतर आता वॅक्सीनबद्दल सपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

करोनाला आळा घालण्यासाठी देशभरातील जनतेला वॅक्सीनची प्रतीक्षा असताना, दुसरीकडे समाजवादी पार्टीकडून या वॅक्सीनबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केली जात आहेत. काल सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी आम्ही भाजपाच्या वॅक्सीनवर विश्वास ठेवू शकत नाही, असं सांगितलं. तर, त्यापाठोपाठ आता समाजवादी पार्टीचे मिर्झापूरचे विधानपरिषद सदस्य आशुतोष सिन्हा यांनी देखील वॅक्सीनबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे.

“कोविड-19 वॅक्सीनमध्ये काहीतरी असं असू शकतं, ज्यामुळे नुकसान होईल. उद्या लोकं म्हणतील वॅक्सीन लोकसंख्या कमी करण्यासाठी/मारण्यासाठी दिलं गेलं आहे. तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता. काहीपण होऊ शकतं.” असं खळबळजनक विधान समाजवादी पार्टीचे मिर्झापूरचे आमदार आशुतोष सिन्हा यांनी केलं आहे.

तसेच, अखिलेश यादव यांनी वॅक्सीन संदर्भात केलेल्या विधानाबद्दल आपणास माहिती नाही. परंतु, जर त्यांनी काही म्हटलं असेल तर यामध्ये गंभीरता नक्कीच असेल. असं देखील आशुतोष सिन्हा यांनी सांगितलं आहे.

तर, “मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? जेव्हा आमचे सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपाची लस घेऊ शकत नाही.” असं अखिलेश यादव यांनी म्हटलेलं आहे.

भाजपाच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू? – अखिलेश यादव

दरम्यान, केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने शनिवारी आणखी एका करोना प्रतिबंधक लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली. ‘कोव्हॅक्सीन’ ही लस ‘भारत बायोटेक’ने देशात विकसित आणि उत्पादित केली आहे.

आणखी एक लस

‘ऑक्सफर्ड’ने विकसित केलेल्या आणि सीरम इन्स्टिटय़ूटने उत्पादित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या आपत्कालीन वापरास केंद्रीय औषध मानक नियंत्रक संघटनेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यापाठोपाठ शनिवारी तज्ज्ञांच्या समितीने ‘कोव्हॅक्सीन’ लशीच्या आपत्कालीन वापरास काही शर्तीवर मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 9:03 am

Web Title: covid19 vaccine you can even become impotent anything can happen sp mlc ashutosh sinha msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 असा काही त्रास असेल, याची कल्पनाही करू शकत नाही- ममता बॅनर्जी
2 अँजिओप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, करोना चाचणी निगेटिव्ह
3 …तर २६ जानेवारीला दिल्लीत ट्रॅक्टर परेड, शेतकरी संघटनांचा इशारा
Just Now!
X