News Flash

कोलकात्यात डाव्या पक्षांचा मोर्चा

तृणमुल काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीनेही पुतळ्याच्या मोडतोडीचा नोंदवला निषेध

कोलकातामध्ये मंगळवारी सायंकाळी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारानंतर काही जणांकडून ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली. या कृत्याच्या निषेधार्थ आज (दि.१५) सीपीआय (एम) चे महासचिव सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वात कोलकात्यात मोर्चा काढून विरोध दर्शवण्यात आला.

यावेळी सीताराम येचुरी यांनी कोलकत्यात असे कसे काय घडू शकते? याचा शोध घेण्यासाठी या घटनेचा तपास झाला पाहिजे, असे म्हटले. तर तृणमुल काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीने देखील ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या मोडतोडीचा निषेध व्यक्त केला.

दुसरीकडे तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्यासागर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केली आहे, असा आरोप भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी केलेला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 2:15 pm

Web Title: cpi marxist holds protest against statue of vidyasagar vandalised in violence
Next Stories
1 सीआरपीएफच्या जवानांमुळे जिवंत बाहेर पडू शकलो: अमित शाह
2 मुंबई हल्ल्यातील मोस्ट वाँटेड अब्दुल मक्कीला पाकिस्तानमध्ये अटक
3 बापरे! तरुणाच्या पोटातून काढले ११६ खिळे, वायर अन् छर्रे
Just Now!
X