राजधानी दिल्लीमध्ये करोना व्हायरसचा विळाखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. आज केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीफ) आणखी १२ जवानांना करोना विषाणूची लागण झाली आहे. दिल्लीमध्ये एकूण करोना झालेल्या सीआरपीएफच्या जवानांची संख्या १२२ झाली आहे. मागील दोन आठवड्यात १२२ सीआरपीएफच्या जवानांना करोना झाला आहे. दरम्यान आणखी १५० जणांचे रिपोर्ट्स येणे अद्याप बाकी आहेत. त्यामुळे संख्या अद्याप वाढण्याची शक्यता आगे. खबरदारीचा उपाय म्हणून संपुर्ण बटालियनला क्वारंटीन करण्यात आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे दोन आठवड्यात १२२ जवानांना करोनाची लागण झाली असून सर्वजण एकाच बटालियनमधील आहेत. मयूर विहार फेझ-३ येथे हे सर्व जवान तौनात आहेत. करोनाचा हा विषाणू आता अर्धसैनिक दलापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2020 1:20 pm