News Flash

सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एक जवान शहीद; १२ वर्षाच्या मुलाचाही मृत्यू

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लहान मुलाने गमावला जीव

संग्रहित (PTI)

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला असून एका स्थानिक मुलाचाही मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या ९० बटालियनवर हल्ला केला. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

दहशतवादी दुचाकीवरुन आले होते. यावेळी त्यांनी सीआरपीएफच्या गस्त पथकावर गोळीबार केला. सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, जवानांना राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षेसाठी पाठवण्यात आलं होतं. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान आणि १२ वर्षाचा मुलगा जखमी झाला होता. दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांचं निधन झालं.

दरम्यान पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. चकमक अद्यापही सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 1:31 pm

Web Title: crpf jawan child killed in terrorist attack in anantnag of jammu kashmir sgy 87
Next Stories
1 जागतिक गुंतवणूकदार आता युपीच्या प्रेमात – पंतप्रधान मोदी
2 सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर
3 जी कारवाई करायची आहे ती करा, मी इंदिरा गांधींची नात आहे ! प्रियंका गांधीनी योगींना सुनावलं
Just Now!
X