देशातील घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांची सुविधा आणि त्यांना सुलभतेनं उत्तम दर्जाची सेवा मिळण्याच्या दृष्टीने केंद्र सरकराने गेल्या काही काळामध्ये प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता ग्राहकांना हव्या त्या वितरकाकडू LPG गॅस सिलेंडर घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात असून सुरुवातीला प्रायोगित तत्वावर ही सुविधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये या सुविधेची चाचपणी केली जाणार असून त्यामध्ये पुण्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे पुणेकरांना लवकरच आपल्याला हव्या त्या वितरकाकडून LPG गॅस सिलेंडर भरून घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

उपलब्ध पर्यायांची मिळणार यादी!

पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयानुसार देशातल्या काही शहरांमध्ये ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला उपलब्ध होणार असून त्याच्या निष्कर्षांनंतर व्यापर स्तरावर देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या एचपी, भारत पेट्रोलियम आणि इंडेन या कंपन्यांचे गॅस सिलेंडर वापरासाठी उपलब्ध आहेत. मात्र, हे सिलेंडर वितरीत करण्यासाठी स्थानिक पातळीवर वितरकांना एजन्सी दिली जाते. मात्र, आता आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही वितरकाकडून आपण संबंधित कंपनीचा गॅस सिलेंडर घेऊ शकतो. यासाठी निवडण्यात आलेल्या शहरांमध्ये पुणे शहरासोबतच चंदीगढ, कोयम्बतूर, गुरगाव आणि रांची या शहरांचा देखील समावेश आहे.

 

कसा निवडाल पर्याय?

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून देशात निर्माण झालेल्या करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे अनेक कंपन्यांनी ऑनलाईन किंवा मोबाईलवर सिलेंडर बुक करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. इंडेन, एचपी आणि भारत पेट्रोलियम या प्रमुख कंपन्यांचे LPG गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत. त्यानुसार मोबाईल अॅप किंवा ऑनलाईन वेबसाईटवरून सिलेंडर बुकिंग करताना ग्राहकांना त्यांच्या परिसरात सेवा देणाऱ्या डिलिव्हरी डिस्ट्रिब्युटर्सची अर्थात वितरकांची यादी दाखवली जाईल. त्यामधून ग्राहकांना हवा तो पर्याय निवडण्याची सुविधा असेल.

केंद्राच्या धोरणांमुळेच इंधन दरवाढ – पृथ्वीराज चव्हाण

अशा प्रकारे वितरकांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्यास त्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. तसेच, ग्राहकांना देखील पर्याय निवडण्याचा अधिकार मिळेल. वितरकांना त्यांची सेवा सुधारण्यासाठी देखील मदत मिळू शकेल. दरम्यान, ही सेवा प्रायोगिक तत्वावर कधीपासून सुरू होईल, याविषयी अधिकृतपणे जाहीर केले जाईल.