हिंदूसाठी पवित्र असणाऱ्या गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे, अशी मागणी अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इल्यासी यांनी केली आहे. ते बुधवारी गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करावे, हा संदेश आपण सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे, असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सभागृहातील अनेकांनी उभं राहून टाळ्या वाजवत त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी त्यांनी दिल्लीत घडलेला एक किस्साही सांगितला. दोन वर्षांपूर्वीची घटना आहे. दिल्लीत जैन आणि मुस्लिम कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहत होते. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम कुटुंब बकरीचा बळी देत असल्यानं जैन कुटुंबीय दहा दिवस घर सोडून जायचे. मला या गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर मी त्या मुस्लिम कुटुंबीयांना भेटलो. आपल्या धार्मिक व्यवहाराने शेजाऱ्यांना त्रास होऊ नये असं मानव धर्म सांगतो. त्यामुळे शेजाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर त्या मुस्लिम कुटुंबांनी बकरी ईदीच्या दिवशी बाहेर जाऊन बळी द्यायला सुरूवात केली. त्यामुळे जैन कुटुंबीयांच्या भावनांचा योग्य मान राखला गेला, असे त्यांनी सांगितले.

बकरीला राष्ट्रीय बहिण घोषित करा- आप नेता

गेल्या काही दिवसांपासून देशभरात गोहत्येवरून मोठा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाने मात्र गाय हा राष्ट्रीय पशू म्हणून जाहीर करण्यात यावा, यासाठी आग्रह धरला होता. याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारशी विचारविनिमय करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले होते. ‘नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्यांनी गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित केले आहे. भारत हा पशुपालनावर आधारित कृषिप्रधान देश आहे. घटनेच्या ४८ आणि ५१ अ (ग) या कलमांनुसार राज्य सरकारने गायीला कायदेशीर संरक्षण द्यायला हवे,’ असेही न्यायमूर्तींनी आपल्या आदेशात म्हटले होते.

मोराच्या अश्रूने लांडोर गर्भवती, न्यायाधीशांच्या जावईशोधाने ‘हसू’ अनावर

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Declare cow the national animal says chief imam
First published on: 31-08-2017 at 14:45 IST