25 February 2021

News Flash

अत्याचार ते दोषी!

दिल्लीत गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी पॅरामेडिकलच्या एका विद्यार्थिनीवर चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार झाला व नंतर तिचा परदेशात उपचारांसाठी हलवल्यानंतर मृत्यू झाला,

| September 11, 2013 12:27 pm

दिल्लीत गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी पॅरामेडिकलच्या एका विद्यार्थिनीवर चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार झाला व नंतर तिचा परदेशात उपचारांसाठी हलवल्यानंतर मृत्यू झाला, त्यामुळे देशात स्त्रियांवरील अत्याचारांचे वास्तव अधिक प्रखरतेने सामोरे आले. या घटनेनंतर जलद गतीने तपास होऊन आता सर्व चारही आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे.
१६ डिसेंबर २०१२- पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर एका खासगी बसमध्ये सामूहिक बलात्कार झाला व नंतर क्रूरपणे हल्ला करण्यात आला. नंतर तिला व तिच्या मित्राला बाहेर फेकून देण्यात आले. त्यांना नंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
१७ डिसेंबर २०१२- या घटनेचे वृत्त समजल्यानंतर मोठय़ा प्रमाणात निदर्शने सुरू झाली व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
१७ डिसेंबर २०१२- पोलिसांनी बसचालक राम सिंग, त्याचा भाऊ मुकेश, विनय शर्मा व पवन गुप्ता या चार आरोपींना शोधून काढले.
१८ डिसेंबर २०१२- रामसिंग व इतर तिघांना अटक.
२० डिसेंबर २०१२- पीडित मुलीच्या मित्राची साक्ष.
२१ डिसेंबर २०१२- या बलात्कारातील बाल गुन्हेगाराला आनंद विहार बसस्थानकावर ताब्यात घेतले. पीडित मुलीच्या मित्राने मुकेशला ओळखले. पोलिसांचे हरयाणा व बिहारमध्ये छापे.
२१-२२ डिसेंबर २०१२- सहावा आरोपी अक्षय ठाकूर याला बिहारमधील औरंगाबाद जिल्हय़ात अटक, नंतर दिल्लीत आणले. पीडित मुलीचे रुग्णालयात विशेष दंडाधिकाऱ्यांपुढे निवेदन.
२३ डिसेंबर २०१२- निदर्शक प्रतिबंधात्मक आदेश मोडून दिल्लीच्या रस्त्यावर. कॉन्स्टेबल सुभाष तोमर जमावाला नियंत्रित करताना जखमी, रुग्णालयात दाखल.
२५ डिसेंबर २०१२- पीडित मुलीची प्रकृती गंभीर. कॉन्स्टेबल तोमर यांचा मृत्यू.
२६ डिसेंबर २०१२- पीडित मुलीस हृदयविकाराचा झटका, सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात सरकारने हलवले.
२९ डिसेंबर २०१२- पीडित मुलीचा पहाटे सव्वादोन वाजता मृत्यू. एफआयआरमध्ये खुनाच्या गुन्हय़ाची नोंद.
२ जानेवारी २०१३- सरन्यायाधीश अल्टामस कबीर यांनी लैंगिक गुन्हेविषयक जलदगती न्यायालयाचे उद्घाटन केले.
३ जानेवारी २०१३- पाच प्रौढ आरोपींवर खून, सामूहिक बलात्कार, अपहरण, अनैसर्गिक गुन्हे, दरोडा हे आरोप दाखल.
५ जानेवारी २०१३- आरोपपत्राची न्यायालयाकडून दखल.
७ जानेवारी २०१३- इन कॅमेरा सुनावणीचा न्यायालयाचा आदेश.
१७ जानेवारी २०१३- पाच प्रौढ गुन्हेगारांवरील खटल्याची सुनावणी सुरू.
२८ जानेवारी २०१३- बालगुन्हेगार न्याय मंडळाने बालगुन्हेगार अल्पवयीन असल्याचे सांगितले.
२ फेब्रुवारी २०१३-जलदगती न्यायालयाने पाच प्रौढ आरोपींवर आरोप निश्चित केले.
२८ फेब्रुवारी २०१३- बालगुन्हेगार न्याय मंडळाने बालगुन्हेगारावर आरोप निश्चित केले.
११ मार्च २०१३- आरोपी रामसिंग याची तिहार तुरुंगात आत्महत्या.
२२ मार्च २०१३- राष्ट्रीय प्रसारमाध्यमांना वार्ताकनाची दिल्ली उच्च न्यायालयाकडून परवानगी.
५ जुलै २०१३- बालगुन्हेगारी न्याय मंडळाने सुनावणी पूर्ण केली. निकाल ११ जुलैपर्यंत राखीव.
८ जुलै २०१३- जलद गती न्यायालयाने साक्षीपुरावे नोंदवण्याचे काम पूर्ण केले.
११ जुलै २०१३- बालगुन्हेगारी न्याय मंडळाने बालगुन्हेगारास १६ डिसेंबरला सामूहिक बलात्कारापूर्वी एका सुताराला डांबून लुटल्याप्रकरणी दोषी ठरवले. दिल्ली उच्च न्यायालयाने तीन आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांना खटल्याच्या वार्ताकनाची परवानगी दिली
२२ ऑगस्ट २०१३- जलदगती न्यायालयात अंतिम युक्तिवाद सुरू.
३१ ऑगस्ट २०१३- बालगुन्हेगार सामूहिक बलात्कार व खून या आरोपांखाली दोषी. तीन वर्षे सुधारगृहात रवानगी.
३ सप्टेंबर २०१३- जलदगती न्यायालयाची सुनावणी पूर्ण. निकाल राखीव.
१० सप्टेंबर २०१३- मुकेश, विनय, अक्षय, पवन या आरोपींवरचे सामूहिक बलात्कार, खून यासह १३ गुन्हे सिद्ध.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 12:27 pm

Web Title: delhi gangrape sequence of events
Next Stories
1 सीरियावरील हल्ला टळला?
2 मुझफ्फरनगरात तणावपूर्ण शांतता
3 त्वचेवरील विशिष्ट रसायनामुळे डासांपासून बचाव
Just Now!
X