01 March 2021

News Flash

बायकोला सोशल मीडियाचे व्यसन, नवऱ्याचा घटस्फोटासाठी अर्ज

पत्नीच्या वकिलाने सगळे आरोप फेटाळले

माझी बायको सोशल मीडिया अॅडिक्ट झाली आहे. तिला त्याचे व्यसनच लागले आहे, त्यामुळे मला घटस्फोट मिळावा असा अर्ज तिच्या नवऱ्याने केला आहे. दिल्लीत ही घटना घडली आहे. नरेंद्र सिंग असे याचिकाकर्त्याचे नाव आहे अशी माहिती समोर आली असून इंडिया टुडेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. दिल्लीतील कौटुंबिक न्यायालयात नरेंद्र सिंग यांनी ही याचिका दाखल केली आहे. माझी पत्नीला सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच तिला व्हर्च्युअल वर्ल्डच आवडते, असेही या याचिकेत म्हटले आहे.

पत्नी रात्रभर व्हॉट्स अॅपवर चॅट करत बसते आणि सोशल मीडियावरचे अपडेट चेक करत असते. त्याचा मला त्रास होतो. आमचे लग्न होऊन वर्षही पूर्ण व्हायचे आहे, मात्र लग्न झाल्यापासूनच माझ्या पत्नीला सोशल मीडियाच आवडते तिला संवाद साधण्यात काही रस नाही असेही नरेंद्र सिंगने याचिकेत म्हटले आहे. माझी पत्नी तिच्या मित्रांशी व्हॉट्स अॅपवरून चॅट करत असते मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती काही आपले चॅट्स थांबवण्यास तयार नाही उलट तिने मलाच धमकावले असेही नरेंद्र सिंगने म्हटले आहे. इंडिया टुडेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

नरेंद्र सिंगच्या पत्नीच्या वकिलाने हे सगळे आरोप फेटाळले आहेत. नरेंद्र सिंग पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कोर्टाने या दोघांनाही विचार करण्यासाठी जुलै महिन्याची मुदत दिली आहे. माझी पत्नी सोशल मीडियावरच सगळा वेळ घालवते. घरातली जबाबदारीची कामे करत नाही. सोशल मीडिया आणि अपडेट्सच्या नादात त्याकडे दुर्लक्ष करणे नित्याचेच झाले आहे असेही नरेंद्र सिंगने म्हटले आहे.

हल्लीच्या काळात सोशल मीडियाचा तरुणांवरचा प्रभाव वाढला आहे. सोशल मीडियावर अपडेट्स टाकण्याच्या नादात आणि व्हर्चुअल जग खरे वाटू लागल्याने अनेक जोडप्यांमध्ये संवादच नसल्याची समस्या बघायला मिळते. त्यातून अशा घटना समोर येतात असे मत दिल्लीतील समुपदेशक पूजा मेहता यांनी व्यक्त केले आहे. दिल्लीत अशा अनेक घटना समोर आल्याचेही त्या म्हटल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 4:47 pm

Web Title: delhi man seeks divorce from social media addict wife
Next Stories
1 जाणून घ्या, सध्या दाऊदच्या डी कंपनीची सूत्रे कोणाकडे?
2 अहमदाबादमध्ये धावत्या कारमध्ये २२ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार
3 गोव्यात टॅक्सी चालकाचा २० वर्षीय तरुणीवर बलात्कार
Just Now!
X