News Flash

स्पॉट फिक्सिंग: श्रीशांत, चंडिला, चव्हाणसह २६ आरोपींवर मोक्का

स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेल्या क्रिकेटपटू एस. श्रीशांत, अजित चंडिला, अंकित चव्हाण यांच्यासह एकूण २६ आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचा निर्णय दिल्ली

| June 4, 2013 01:13 am

स्पॉट फिक्सिंगचा आरोप असलेल्या क्रिकेटपटू एस. श्रीशांत, अजित चंडिला, अंकित चव्हाण यांच्यासह एकूण २६ आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदांतर्गत (मोक्का) कारवाई करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला आहे. 
श्रीशांतसह अन्य आरोपींचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याची मागणी पोलिसांनी दिल्लीच्या महानगरदंडाधिकाऱयांकडे केलीये. या सर्वांविरोधात मोक्का लावण्यात आल्यामुळे त्यांचे जामीनाचे अर्ज विशेष न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आलीये. दरम्यान, मोक्कानुसारही कारवाई करण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतल्यामुळे आता या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळणं कठीण होणार आहे. न्यायालयाने या प्रकरणातील एक आरोपी अंकित चव्हाणला लग्नासाठी तात्पुरता जामीन दिला होता. त्याच्या जामीनाची मुदतही मंगळवारीच संपुष्टात येत आहे.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणाचे धागेदोरे कुख्यात दाऊद इब्राहिमपर्यंत पोहोचत असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्यामुळे या सर्व आरोपींविरुद्ध मोक्का लावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2013 1:13 am

Web Title: delhi police has been invoked mcoca in ipl fixing case against sreesanth chandila chavan
टॅग : Ipl,Spot Fixing,Sreesanth
Next Stories
1 ब्रिटन, जर्मनीपाठोपाठ बेल्जियमला मोदींबरोबर व्यापारात रस
2 सॅमसंगचा नवा गॅलेक्सी टॅब ३, ‘इंटेल’चा प्रोसेसर असलेला पहिला टॅब्लेट
3 निवडणूक खर्चप्रकरणी सरकारी भूमिकेला आयोगाची चपराक
Just Now!
X