देशात सध्या निवडणुकांचे वारे वेगाने वाहण्यास आता सुरुवात झाली आहे. त्यात राम मंदिर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी श्री रामायण एक्स्प्रेसला बुधवारपासून सुरुवात झाली. दिल्लीच्या सफदरगंज स्टेशनपासून या एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दखवण्यात आला. यामध्ये प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध ठिकाणांना भेटी देण्यात येणार आहेत. सोळा दिवसांचा हा प्रवास श्रीलंकेमध्ये संपणार आहे.


दिल्लीच्या सफदरगंज रेल्वे स्थानकांतून या श्री रामायण एक्स्प्रेसने धाव घेतली. त्यानंतर ही एक्स्प्रेस १६ दिवसांमध्ये प्रभू रामाच्या संबंधीत प्रत्येक ठिकाणी प्रवास करणार आहे. भारतीय रेल्वेने सुरु केलेल्या रामायण यात्रेचा शेवट श्रीलंकेत होणार आहे. मात्र, त्यासाठी चेन्नईवरुन श्रीलंकेकडे विमान सेवेद्वारे प्रवासाची सोय करण्यात येणार आहे. या विमानात एकाच वेळी ८०० प्रवासी प्रवास करु शकतात.

दिल्लीतून सुरु झालेल्या या एक्स्प्रेसचा पहिला थांबा हा अयोध्या असणार आहे. त्यानंतर नंदीग्राम, सातामरी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, श्रीगव्हरपूर, चित्रकुट, नाशिक, हंपी आणि रामेश्वरम या ठिकाणी ही विशेष रेल्वे थांबणार आहे. तर सफदरगंज, गाझीयाबाद, मोरादाबाद, बरेली आणि लखनऊ येथून पर्यटकांना रेल्वेत बसता येणार आहे.

आयआरसीटीसीने नियोजन केलेल्या या रामायण यात्रा पॅकेजमध्ये ५ रात्री आणि ६ दिवस असणार आहेत. या पॅकेजची एकूण किंमत रुपये ३६,९७० इतकी असणार आहे.