दिल्लीहून दिब्रुगडला जाणाऱया राजधानी एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर, १२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
बिहारच्या छापरामध्ये  मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दिल्लीहून दिब्रुगडला जाणाऱया एक्स्प्रेसला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये एक्स्प्रेसचे तब्बल ११ डबे रुळावरून घसरले आहेत. घटनास्थळी रेल्वेचे अत्यावश्यक सेवा पथक दाखल झाले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अपघाताचेही कारणही अद्याप कळू शकलेले नाही. परंतु, अपघातामागे घातापाताची शक्यता रेल्वेबोर्डाच्या अधिकाऱयांनी वर्तविली आहे.
त्याचबरोबर अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख आणि जखमींना २० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)