मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सुत्रधार व जमात उद दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हफीज सईद याची भेट घेतलेले पत्रकार वेद प्रकाश वैदिक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच असल्याचे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
तसेच ते म्हणाले की, “वैदिक हे संघाचेच आहेत, ही बाब उघड आहे. परंतु, सईद व वैदिक भेट पाकिस्तानमधील भारतीय दूतावासाने घडवून आणली आहे का? हे जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.”
दरम्यान, सईद-वैदिक भेटीवरून लोकसभेत रणकंदन सुरू झाले. यावर भाजप सरकारने वैदिक यांच्याशी संबंध असल्याच्या आरोप फेटाळून लावत सुरूवातीला स्पष्टीकरण देण्यास नकार दिला.
वैदिक-सईद भेटीशी सरकारचा संबंध नाही – सुषमा स्वराज
त्यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सरकारच्यावतीने सईद-वैदिक भेटीमागे भारत सरकारचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण लोकसभेत दिले आहे.