05 August 2020

News Flash

जम्मू-काश्मीर : १५ लाखांचा इनाम असलेल्या ‘हिजबुल’च्या कमांडरचा खात्मा

'आरएसएस'चे पदाधिकारी चंद्रकांत शर्मा व किश्तवाडमधील परिहार बंधुंचा हत्यारा

संग्रहीत छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे आज जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या जिल्हा कमांडर हारुण हफाज याचा खात्मा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी चंद्रकांत शर्मा व त्यांच्या सुरक्षारक्षाकसह किश्तवाड येथील परिहार बंधुंचा हारुण हफाज हा हत्यारा आहे.

अनेक दिवसांपासून हारुण हफाजचा शोध सुरू होता. पोलिसांनी त्याच्यावर तब्बल १५ लाख रुपायांचा इनाम देखील ठेवलेला होता. या कारवाईनंतर परिसरात अन्य देखील दहशतवादी लपून बसलेले असल्याची शक्यता असल्याने, जवानांकडून संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबलवी जात आहे.

काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन आलेला असताना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तीन संशयीत दहशतवाद्यांना देखील ताब्यात घेतलेले आहे. ख्वाजा मोइद्दीन, अब्दुल समद आणि सय्यद अली नवाज अशी त्यांची नावं असल्याचे समोर आले आहे. दिल्ली-एनआरसी किंवा उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी हल्ला घडवण्याचा ते कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 3:22 pm

Web Title: district commander of hizbul mujahideen harun hafaz has been gunned down by security forces in an encounter in doda msr 87
Next Stories
1 हल्ला केला तर चीनला मोठी किंमत मोजावी लागेल, तैवानच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा
2 निर्भयाच्या दोषींना २२ जानेवारीला फाशी नाही….
3 भारतासमोर तेलाचा प्रश्न? सच्चा मित्र रशिया देणार साथ
Just Now!
X