द्रमुकच्या सदस्यांना ऊर्वरित अधिवेशन कालावधीसाठी निलंबित करण्याच्या निर्णयाचे तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांनी जोरदार समर्थन केले असून, आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी फेटाळली आहे.
 याबाबत डीएमडीके, डावे, एमएमके आणि पीटी या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अध्यक्षांकडे चर्चा करण्याची मागणी केली. निलंबित करण्यात आलेल्या द्रमुकच्या सदस्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, कारण त्यांना त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नांवर बोलावयाचे आहे, असे डीएमडीकेचे मुख्य प्रतोद व्ही. सी. चंद्रकुमार म्हणाले.
या चर्चेत हस्तक्षेप करताना सभागृहाचे नेते ओ. पनीरसेल्वम यांनी सभागृहात २२ जुलै रोजी झालेल्या प्रकाराचा उल्लेख केला.