पाकिस्तानी संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिदी आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नावर भाष्य केलं आहे. काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही, #SaveKashmir अशा आशयाचं ट्विट शाहिद आफ्रिदीने केलं आहे.

सध्या संपूर्ण जगभरात करोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. शाहिद आफ्रिदी आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजवंतांना मदत करतो आहे. एका कार्यक्रमादरम्यान काश्मीरचं खरं सौंदर्य हे तिथल्या जनेतेने आतापर्यंत दाखवलेल्या धैर्य आणि संयमात असल्याचं वक्तव्य आफ्रिदीने केलं होतं. भारतातील इतर राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरही सध्या लॉकडाउन करण्यात आलेलं असून आतापर्यंत २ हजार ६०० लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

काश्मीरच्या मुद्द्यावर शाहिद आफ्रिदीने याआधीही अनेक प्रक्षोभक वक्तव्य केली आहेत. भारतीय सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतरही आफ्रिदीने ट्विटरवर आगपाखड केली होती. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेने या प्रश्नात मध्यस्थी करावी अशी मागणीही आफ्रिदीने यावेळी केली होती.