25 April 2019

News Flash

अशा इमेल्स किंवा अलर्टवर क्लिक करणे टाळा, अन्यथा…

असा इ-मेल आल्यास धोक्याची घंटा आहे समजा

( संग्रहीत छायाचित्र )

हॅकिंग आणि साबर गुन्ह्यातून पैशांवर डल्ला मारण्याचा सोपा मार्ग काही लोकांना मिळाला आहे. आपल्याला येणाऱ्या मेल्स किंवा मोबाइलवर कित्येकदा अर्जंट अलर्टसारखे मेसेज येतात. यातून तुमची माहिती चोरली जाते. आपल्याला इमेल अथवा मोबाइलवर येणाऱ्या विविध प्रकारच्या अलर्टवर आपण क्लिक केल्यास आपले लॉगिन , पासवर्ड, पर्सनल माहिती बदलली जाऊ शकतो. त्यामुळे अशाप्रकराच्या येणाऱ्या अलर्टपासून सावध रहायला हवे. जर तुम्ही अनोळखी मेल्स किंवा अलर्टवर क्लिक केल्यास तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. अशाच प्रकारच्या मेसेजची माहिती खाली दिली आहे.

  • Password Check Required Immediately- असा इ-मेल आल्यास धोक्याची घंटा आहे समजा, त्यामुळे असा इमेल दिसल्यास सावधानता बाळगा. त्यावर क्लिक करू नका.
  • Change of Password Required Immediately – अशा विषयांचा मेल आल्यास क्लिक करू नका. क्लिक करणे टाळा. तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते.
  • Urgent press release to all employees – आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करत असता. त्यावेळी लॅपटॉप अथवा कॉम्पुटरवर असा अलर्ट येतो. आपण ऑफिसचा असल्यामुळे क्लिक करायला जातो. पण असा अलर्ट आल्यास त्यावर क्लिक करणे टाळा.
  • De-activation of [[email]] in Process- इमेलमध्ये असा अलर्ट आल्यास त्यावर क्लिक करू नका.

    Revised Vacation & Sick Time Policy- असा इमेल आल्यास तो संदिग्ध आहे असे समजा. त्यावर क्लिक करून स्वता:चे नुकसान करून घेऊ नका.
  • तुम्हाला अनोळखी मेल आला असेल आणि त्याचा सब्जेक्ट UPS Label Delivery, 1ZBE312TNY00015011 असा असेल तर सावधान. त्यावर क्लिक करू नका. अथवा त्याला कोणताही रिप्लाय देऊ नका.
  • Staff Review 2017- चुकूनही क्लिक करु नका. क्लिक केल्यास तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागू शकते.
  • Company Policies — Updates to our Fraternization Policy- असा इमेल आल्यास तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला असे समजा. अशा मेलला कोणताही रिप्लाय किंवा क्लिक करू नका.
  • Security Alert- असा इमेल आल्यास समजा सायबर गुन्ह्यातील सर्वात घातक पैकी एक आहे. त्यामुळे याला काही उत्तर देऊ नका अथवा क्लिक करू नका.

First Published on August 7, 2018 2:50 pm

Web Title: dont clicking on these emails