गणेशोत्सवाची राज्यभरात जय्यत तयारी सुरु आहे. गणरायाचे स्वागत भक्तीभावाने आणि उत्साहाने करण्यासाठी प्रत्येक शहरात वेगवेगळ्या प्रकारे तयारी सुरु आहे. गणेशाची भक्तीभावाने पूजा अर्चा करण्याची लोकप्रियता राज्याभरासह देशभरातही दिसून येत आहे. राज्यात गणेशाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असताना राजस्थानमध्ये चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणेशाच्या समोर लाखो लाडूंचा प्रसाद ठेऊन प्रदर्शन भरविण्यात आले. राजस्थानमधील जयपूरमध्ये मोती डुंगरी मंदीरामध्ये गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर लाडूंचे हे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये मंदीर प्रशासनाकडून तब्बल १ लाख २५ हजार लाडू गणेश मुर्तीसमोर ठेवण्यात आले. या प्रदर्शनामध्ये २५१ किलो ग्रॅमचा सर्वाधिक मोठा लाडू ठेवण्यात आला असून १५१ किलो तसेच ५१ किलो आणि १०० ग्रॅम अशा प्रकारे वर्गवारी करुन लाडू ठेवण्यात आले आहेत.