आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दिल्लीत जातीय हिंसाचार घडवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. नोटिशीला २० जानेवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत उत्तर द्यायचे आहे, अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे. भाजपचे दिल्ली अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. त्रिलोकपुरी व नंदनगरी या भागात भाजपने दंगे घडवले असून, ननगलोई व बवाना परिसरातही दंग्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता.