जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साईट असा लौकिक असलेल्या फेसबुक ही वेबसाईट डाऊन झाली आहे. शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून फेसबुक ही वेबसाईट अचानाक डाऊन झाली आहे. यानंतर जगभरातील नेटिझन्सनी आपला मोर्चा हा ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटकडे वळविला आहे.

अनेक प्रकारच्या विनोदी जिफ फाईल टाकून फेसबुक डाऊन झाल्याची खिल्ली उडवली जाते आहे. इतकेच नाही तर ‘फेसबुक डाऊन’ हा हॅशटॅग वापरून फेसबुक डाऊन असल्याचे सांगितले जाते आहे.

फेसबुकवर कोणतीही पोस्ट पब्लिश करण्यात अडचणी येत आहेत, त्याचप्रमाणे कोणत्याही पोस्टला कमेंट किंवा लाईक करताना अनंत अडचणी येत आहेत अशी तक्रार जगभरातले लाखो नेटिझन्स करत आहेत. दुरूस्तीसाठी काही काळ फेसबुकची सुविधा उपलब्ध नाही तुम्ही थोड्या वेळाने प्रयत्न करा अशा कमेंट फेसबुकवर येत आहेत. त्यामुळे अनेक नेटिझन्सनी आता ट्विटरचा आधार घेतला आहे.