03 March 2021

News Flash

फेसबुक लाईव्हदरम्यान मुख्यमंत्री आणि कुटुंबाविरोधात आक्षेपार्ह भाषा, दोघांना अटक

पोलिसांनी व्हिडीओ फेसबुकवरुन हटवला आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

फेसबुक लाईव्हदरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सिद्धराजू आणि जौमराजू अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी हा व्हिडीओ फेसबुकवरुन हटवला आहे. दरम्यान कर्नाटकमधील विरोधी पक्ष अटकेच्या कारवाईचा निषेध करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोघांनी २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकालआल्यानंतर फेसबुक लाईव्ह केलं होतं. या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी, एचडी देवेगौडा आणि कुमारस्वामींचे पुत्र निखील यांच्यासाठी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली होती. यासोबत फेसबुक लाईव्ह व्डिहीओ डिलीट केला.

असंच उत्तर प्रदेशातील एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी आणि व्हिडीओ शेअर केल्याने पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणीदरम्यान प्रशांत कनौजिया यांना तात्काळ सोडण्याचा आदेश दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 5:38 pm

Web Title: facebook live karnataka cm hd kumarswamy and former pm hd devegowda abuse 2 men arrested
Next Stories
1 मोदींची पुन्हा एकदा ‘मन की बात’, ३० जूनला सुरुवात
2 विमान अपहरणाची ‘गंमत’ पडली महाग, व्यावसायिकाला जन्मठेप, पाच कोटी रुपये दंड
3 अंतराळातील युद्धशस्त्र प्रणाली विकासासाठी नव्या संस्थेस मंजुरी
Just Now!
X