नव्याने तयार होणा-या स्मार्टफोनच्या बाजारपेठीतील कमी क्षमतेच्या अॅन्ड्रॉईड फोनसाठी ‘स्नॅप्तू’ या कंपनीने ‘फेसबुक लाईट’ हे व्हर्जन बाजारात आणले आहे. केवळ २५२ केबी आकार असलेले हे व्हर्जन टूजी इंटरनेट जोडणी असणा-या स्मार्टफोनसाठी अतिशय उपयुक्त ठरेल, असा कंपनीचा दावा आहे.
विशेष म्हणजे स्मार्टफोनधारकांना ‘फेसबुक लाईट’ प्रभावीपणे वापरता यावे म्हणून ‘पुश नोटीफिकेशन’ आणि ‘कॅमेरा इंटिग्रेशन’ या सुविधांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
सदर अॅप प्रायोगिक तत्त्वावर आशिया आणि आफ्रिका खंडातील काही निवडक देशांमध्येच वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून त्याची चाचणी करून त्यामध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस आहे.
जवळपास दहा हजार लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले असून त्यापैकी ६९३ वापरकर्त्यांनी पाच पैकी ४.६ गुण दिले आहेत.