News Flash

…आणि ‘नीट’ परीक्षा केंद्रावर मुलीला अंतर्वस्त्र काढायला सांगितली

अनेक मुलींना परीक्षा केंद्रावर धक्कादायक वागणूक मिळाली

प्रातिनिधीक छायाचित्र

नीटच्या परीक्षेसाठी कन्नूरमधील परीक्षा केंद्रावर गेलेल्या महिला परीक्षार्थीला एका धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले. परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी परीक्षेला बसण्याआधी अंतर्वस्त्र काढायला सांगितल्याची माहिती एका महिला परीक्षार्थीने दिली. यासोबतच इतरही काही महिला परीक्षार्थींनादेखील अशाच प्रकारचा अनुभव आला. सरकारी आणि खासगी महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी रविवारी (काल) ‘नीट’ची परीक्षा झाली.

‘माझी मुलगी परीक्षा केंद्रावर गेली. त्यानंतर ती बाहेर आली आणि तिने मला तिची अंतर्वस्त्र दिली,’ असे परीक्षा केंद्राबाहेर थांबलेल्या एका आईने सांगितले. यासोबतच एका दुसऱ्या महिला परीक्षार्थीला तिने परिधान केलेल्या कपड्यांवरील पॉकेट्स आणि मेटलची बटणे काढायला सांगण्यात आले. ‘तिने जीन्स घातली होती. त्या जिन्सला पॉकेट्स आणि आणि मेटलची बटणे होती. त्यांनी तिला पॉकेट्स आणि बटणे काढायला सांगितली. त्यानंतर मी परीक्षा केंद्रापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या एका दुकानात गेलो. ते दुकान उघडण्याची वाट पाहिली आणि तिथून एक नवा ड्रेस घेऊन आलो,’ अशी माहिती मुलीच्या वडिलांनी दिली.

नीट परीक्षा केंद्राजवळ राहणाऱ्या काही लोकांनी महिला परीक्षार्थींना ‘परीक्षा योग्य’ कपडे उपलब्ध करुन दिले आणि त्यांना मदत केली. ‘परीक्षा केंद्राजवळील एका मुस्लिम कुटुंबाने परीक्षेला आलेल्या सहा मुलींना टॉप दिले. धक्कादायक बाब म्हणजे परीक्षा केंद्रावरील अधिकारी कोणालाही पूर्ण बाह्यांचे टॉप घालून परीक्षेला बसण्याची परवानगी देत नव्हते. त्यांनी टॉपच्या बाह्या कापून मुलींना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली,’ असे एका पालकाने सांगितले.

‘परीक्षा केंद्रावर अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक मिळाल्यावर किती मुलींना व्यवस्थित परीक्षा देता आली, मुलींचे लक्ष विचलित झाले का, त्यांना संपूर्ण लक्ष केंद्रित करुन परीक्षा देता आली का, या सर्व मुद्यांवर चर्चा होऊ शकते. या प्रकरणी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना पत्र लिहिणार असून या सगळ्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करणार आहे,’ असे केरळच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बिंदू कृष्णा यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 11:03 am

Web Title: female neet candidate in kerala asked to remove innerwear
Next Stories
1 Indian Army destroys Pakistani checkposts: भारताने बदला घेतला! क्षेपणास्त्र डागून पाकच्या चौक्या उद्ध्वस्त
2 French Presidential Election 2017: इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे नवे अध्यक्ष; मेरी ल पेन यांच्यावर दणदणीत विजय
3 Pravin togadia: मोदी सरकारच्या काळात सीमेवरचा जवान सुरक्षित नाही, गावातील शेतकरीही सुखी नाहीत – प्रवीण तोगडिया
Just Now!
X