30 September 2020

News Flash

फिडेल कॅस्ट्रोकडून ‘नाटो’ची नाझींशी तुलना

क्युबातील साम्यवादी क्रांतीचे जनक आणि माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांनी अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांवर सोमवारी जोरदार टीका केली़ या राष्ट्रांना युद्धखोर ठरवीत कॅस्ट्रो यांनी

| September 3, 2014 01:11 am

क्युबातील साम्यवादी क्रांतीचे जनक आणि माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांनी अमेरिका आणि युरोपीय राष्ट्रांवर सोमवारी जोरदार टीका केली़  या राष्ट्रांना युद्धखोर ठरवीत कॅस्ट्रो यांनी नाटोच्या लष्कराची तुलना नाझींशी केली़
क्युबातील स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या स्तंभात त्यांनी अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील धोरणाबद्दल सिनेटर जॉन मॅकेन यांच्यावरही कॅस्ट्रो यांनी टीका केली आह़े  मॅकेन यांना त्यांनी ‘इस्रायलचे विनाअट मित्र’ असे उपरोधाने संबोधल़े
पाश्चिमात्यांच्या उपेक्षावादावर त्यांनी सडकून टीका केली आणि हा साम्राज्यवादी गुणधर्म असल्याचेही त्यांनी म्हटले आह़े
 मॅकेन यांच्याकडून इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेला पाठबळ दिले जात असल्याचे आणि सध्या इराक आणि सीरियाच्या मोठय़ा भागावर ताबा असलेल्या इस्लामी राज्याच्या निर्मितीलाही पाठबळ दिल्याचाही आरोप त्यांनी केला आह़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2014 1:11 am

Web Title: fidel castro compares nato to nazi ss
Next Stories
1 न्यूयॉर्कमधील मोदींच्या कार्यक्रमास उपस्थितीसाठी लॉटरी पद्धत!
2 फाशीची शिक्षा झालेल्यांना आशेचा किरण
3 पर्यावरण कायद्यांचा फेरआढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती
Just Now!
X