तालिबान राजवटीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात हजारो अफगाणी आणि परदेशी नागरिकांनी विमानतळावर गर्दी केली आहे. सोमवारी अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर पुन्हा एकदा गोळीबार झाला. काबूल विमानतळावर झालेल्या गोळीबाराबाबत जर्मन सैन्याचे ट्विट करत माहिती दिली आहे.. काबूल विमानतळावर अफगाण सुरक्षा दल आणि अज्ञात हल्लेखोरांमध्ये गोळीबार झाला. अमेरिकन, जर्मन फौजेचाही त्यात यात समावेश आहे. यामध्ये अफगाण सुरक्षा दलाचा एक सदस्य ठार झाला आणि तीन जखमी झाले आहेत. मृत अफगाण सैनिक विमानतळावर पहारा देण्यासाठी तैनात असलेल्या सैनिकांपैकी एक होता की नाही हे स्पष्ट करता आले नसल्याचे जर्मन लष्कराने ट्विट करत सांगितले.

१५ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी ताब्यात घेतल्यापासून विमानतळावर गोंधळाचे वातावरण आहे. अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय सैन्य त्यांच्या देशातील आणि अफगाणीनी नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी, तालिबान्यांनी सात अफगाण नागरिकांचा मृत्यूच्या एका दिवसानंतर विमानतळावर हल्ला करण्यात आला.

काबूल विमानतळावर गर्दी झाल्याने सात नागरिकांचा मृत्यू झाल्याची कबुली ब्रिटिश लष्कराने दिली आहे. या वेळी चेंगराचेंगरी व धक्काबुक्की झाली, त्यात काही जण जखमी झाले. तालिबानने या वेळी हवेत गोळीबार करून जे लोक विमानात बसण्याच्या प्रयत्नात होते त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला.

अफगाणिस्तानातील परदेशी सैन्याने देश सोडण्याची ३१ ऑगस्टची मुदत वाढवण्याची मागणी केली नाही. तालिबानने एका आठवड्यापूर्वीच अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली आहे कारण अमेरिकेने सैन्य मागे घेतले आहे. तालिबान नेतृत्वाच्या एका वरिष्ठ कायदेशीर सल्लागाराने सोमवारी रॉयटर्सला सांगितले की, तालिबान अमेरिकेच्या सैन्याने देश सोडून जाण्यासाठी अजून मुदतवाढ देणार नाही.

अमेरिकेसह नाटो देशांच्या सैन्याने ३१ ऑगस्टपर्यंत आपल्या लोकांना आणि काही अफगाण लोकांना येथून सोडवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, परिस्थितीचा विचार करता ही मुदत वाढवण्याची शक्यता आहे.

लोकांना तालिबान्यांकडून देश सोडू नका असे आवाहन केले जात आहे, पण मोठ्या संख्येने लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर जायचे आहे. काबूल विमानतळावर अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनीसह अनेक देशांचे सैन्य निर्वासितांना घेऊन जात आहे.