आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २५ भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केली असल्याने या नेत्यांच्या भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे त्यांच्याकडून घ्यावेत आणि जर त्यांनी पुरावे दिले नाहीत तर पुरावे दडपत असल्यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवावा, असा अर्ज ‘आरटीआय’ कार्यकर्ते अ‍ॅड. विवेक गर्ग यांनी भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे केला आहे.भ्रष्टाचारविरोधी विभागाने केजरीवाल यांचा जबाब नोंदवावा आणि त्यांच्या ताब्यातील पुरावे हस्तगत करावेत. जर त्यांनी पुरावे दिले नाहीत तर भ्रष्टाचार दडपण्यात सामील असल्यावरून त्यांच्यावर कारवाई करावी, असे या तक्रारीत म्हटले आहे. ३१ जानेवारीला केजरीवाल यांनी जाहीर सभेत २५ भ्रष्ट नेत्यांविरोधात आपला पक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते.