05 March 2021

News Flash

कालका-हावडा एक्सप्रेसमध्ये लागली आग, पाच प्रवासी जखमी

आग लागताच प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला

(सांकेतिक छायाचित्र)

कालका-हावडा एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.आज (मंगळवारी) पहाटे दिल्ली-अमृतसर रेल्वे मार्गावर कुरुक्षेत्र येथील धीरपूर गावाजवळ ही घटना घडली. यामध्ये पाच प्रवासी जखमी झाले आहेत. आग लागताच प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. जखमींमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. काही प्रवाशांनी आग लागल्यानंतर श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. कालका येथून दिल्लीकडे ही एक्सप्रेस जात होती. पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ट्रेनच्या पुढील डब्ब्याला ही आग लागल्याचं समजतंय. ट्रेनमध्ये आग लागल्याचं समजताच रेल्वे पोलीस, बचाव पथक आणि अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 9:36 am

Web Title: fire broken out in the front coach of kalka howrah express
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 दहशतवादविरोधी लढ्यात भारताला मिळाली अमेरिकेची साथ; ट्रम्प यांचा जाहीर पाठींबा
3 जम्मू-काश्मीर : कुलगाम, पुलवामामध्ये चकमकीत ३ दहशतवादी ठार, एक जवान शहीद
Just Now!
X