News Flash

धक्कादायक! कोर्टाच्या आवारात गोळीबार, हेड कॉन्स्टेबल ठार

हरयाणाच्या भिवानी जिल्ह्यातील कोर्टाच्या आवारात गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या गोळीबारात हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे अशी माहिती हरयाणा पोलिसांनी दिली.

प्रतिकात्मक छायाचित्र

हरयाणाच्या भिवानी जिल्ह्यातील सत्र न्यायालयाच्या आवारात सोमवारी हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी अपहरण प्रकरणातील एका आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न असफल ठरला.

या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल भागीरथ यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन हल्लेखोरांना पकडले असून अन्य दोन पळून जाण्यात यशस्वी ठरले अशी माहिती भिवानीचे पोलीस अधीक्षक गंगा राम पुनिया यांनी दिली.

तीन ते चार हल्लेखोर सिवानीमधील कोर्टाच्या आवारात घुसले. अपहरणाच्या प्रकरणात आरोपी जय कुमार तसेच आणखी एक आरोपी सुनीलला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना तुरुंगात नेण्यात येत होते. त्याच दरम्यान आरोपींनी गोळीबार सुरु केला. जय कुमारला सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2018 5:56 pm

Web Title: firing at haryana court premises
टॅग : Firing
Next Stories
1 अधुना अख्तरच्या वित्त व्यवस्थापीकेची हत्या, मृतदेहाचे केले ३ तुकडे
2 मोदी, शहा आणि येडियुरप्पांना सिद्धरामय्यांची कायदेशीर नोटीस; माफी मागा अन्यथा १०० कोटींचा दावा ठोकणार
3 दुसऱ्या पत्नीला दिलासा नाहीच, मुंबईतील कोर्टाचा निर्णय
Just Now!
X