दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळ गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, अक्षरधाम मंदिराजवळील पांडव नगर परिसरात काही दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दरोडेखोरांची एक टोळी अक्षरधाम मंदिराजवळील पांडव नगर परिसरात लुटमारीच्या उद्देशाने आले होते.त्याचवेळी पोलिसांची टीम देखील घटनास्थळी पोहोचली. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचं समजतंय. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.


दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी आणि अक्षरधामच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पूर्व दिल्लीत अक्षरधाम मंदिर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संवेदनशील क्षेत्र मानलं जातं.