News Flash

पाकमध्ये अल कायदाचे पाच दहशतवादी ठार

पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत अल कायदा या दहशतवादी संघटनेचे पाच दहशतवादी ठार झाले आहेत.

पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत अल कायदा या दहशतवादी संघटनेचे पाच दहशतवादी ठार झाले आहेत. या दहशतवाद्यांचा पंजाब प्रांतातील मंत्र्याच्या हत्येत सहभाग होता, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
कायदा अंमलबजावणी संस्थेच्या सैनिकांच्या गोळीबारात शेखपुरा जिल्ह्य़ात पाच दहशतवादी मारले गेले. उमर फारूक, करी नावेद, सईद रोहेल, इम्रान आणि काशिफ अशी पाच दहशतवाद्यांची नावे आहेत, अशी माहिती पाकिस्तानच्या पंजाब दहशतवाद विरोधी पथकाने दिली. तत्पूर्वी पोलिसांनी तेहरीक ई तालिबान आणि लष्कर-ए-झांघवी या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांना ठार केले होते. शेखपुरा जिल्ह्य़ात सात सशस्त्र दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्या वेळी झालेल्या चकमकीत हे दहशतवादी मारले गेले, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 2:27 am

Web Title: five militant killed in pakistan
टॅग : Pakistan
Next Stories
1 प्रसिद्ध तामिळ अभिनेत्री मनोरमा यांचे निधन
2 मलगट्टी यांचा राजीनामा, पुरस्कार परत करणे सुरूच
3 ‘संपूर्ण क्रांती’च्या आठवणी आणीबाणीविरोधी नेत्यांनी जागवल्या!
Just Now!
X