News Flash

“Fraud-To-Phone” चा पर्दाफाश; ८ जणांना अटक, ३०० मोबाईल जप्त

आज (१५ जून) सुरक्षा एजन्सींनी आठ जणांना अटक करून 'फ्रॉड टू फोन' नेटवर्कचा पर्दाफाश केला आणि त्यांच्याकडून सुमारे ३०० नवीन मोबाईल जप्त केले.

आज (१५ जून) सुरक्षा एजन्सींनी आठ जणांना अटक करून ‘फ्रॉड टू फोन’ नेटवर्कचा पर्दाफाश केला आणि त्यांच्याकडून सुमारे ३०० नवीन मोबाईल जप्त केले, जे त्यांनी चोरी केलेल्या पैशांनी खरेदी केले होते. मंगळवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ही टोळी अनेक राज्यात पसरली होती.

याशिवाय या टोळीचे ९००  मोबाइल फोन, १००० बँक खाती आणि शेकडो युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आणि ई-कॉमर्स आयडीचीही ओळख पटली गेली असून तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा संस्थांनी आतापर्यंत सुमारे १०० बँक खाती आणि डेबिट आणि क्रेडिट कार्डचे व्यवहार रोखले आहेत.

हेही वाचा – अश्लील व्हिडिओ बनवून Blackmail करणारी टोळी ताब्यात, सुंदर मुलींच्या फेक अकाऊंटची घ्यायचे मदत

अटक केलेल्या आरोपींमध्ये झारखंडमधील चार आणि मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमधील प्रत्येकी दोन जण आहेत, अशी माहिती गृहमंत्रलयातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. या टोळीविरूद्ध १८ राज्यात मोहिम चालली. या ३५० लोकांचा सहभाग होता. केंद्रीय गृह मंत्रालय, एफसीओआरडी, मध्य प्रदेश पोलीस आणि इतर काही राज्यांच्या पोलीस दलांनी विशिष्ट माहितीवरुन ही कारवाई केली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, ११ जून रोजी उदयपूर येथे राहणाऱ्या एका ७८ वर्षीय वृद्धाने गृह मंत्रालयाने चालवलेल्या सायबरसेफ अ‍ॅपवर ६.५० लाख रुपयांच्या सायबर फसवणूकीची तक्रार दिली होती. तपासणीदरम्यान, असे दिसून आले की हे पैसे थेट तीन एसबीआय कार्डमध्ये जमा झाले होते, जे फ्लिपकार्ट वरून ३३ शाओमी पोको एम मोबाइल फोन खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले होते. त्यानंतर काही मिनिटांतच हे फोन मध्य प्रदेशातील कोणत्या पत्त्यावर मागविण्यात आले हे शोधण्यात आले. आणि बालाघाट पोलीस अधीक्षकांना याबाबत माहिती देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 6:32 pm

Web Title: fraud to phone busted 8 arrested 300 mobiles seized srk 94
टॅग : Crime News
Next Stories
1 अश्लील व्हिडिओ बनवून Blackmail करणारी टोळी ताब्यात, सुंदर मुलींच्या फेक अकाऊंटची घ्यायचे मदत
2 भारतीय मच्छिमारांची हत्या करणाऱ्या इटालीच्या खलाशांवरील खटला १० कोटींच्या नुकसानभरपाईनंतर संपुष्टात
3 हज यात्रेवर करोनाचे सावट; हज कमिटी ऑफ इंडियाने रद्द केले सर्व अर्ज 
Just Now!
X