News Flash

काश्मीरला निघालेले बीएसएफचे १० जवान ट्रेनमधून बेपत्ता

लष्कराच्या स्पेशल ट्रेनमधून जम्मू-काश्मीरला निघालेले सीमा सुरक्षा दलाचे १० जवान बेपत्ता झाले आहेत. पश्चिम बंगलाच्या बर्धमान ते झारखंडच्या धनबाद रेल्वे स्थानकादरम्यान हे जवान बेपत्ता झाले

लष्कराच्या स्पेशल ट्रेनमधून जम्मू-काश्मीरला निघालेले सीमा सुरक्षा दलाचे १० जवान बेपत्ता झाले आहेत. पश्चिम बंगलाच्या बर्धमान ते झारखंडच्या धनबाद रेल्वे स्थानकादरम्यान हे जवान बेपत्ता झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये निघालेल्या लष्कराच्या या स्पेशल ट्रेनमध्ये एकूण ८३ जवान होते.

उत्तर प्रदेशच्या मुघलसराय रेल्वे स्थानकात ट्रेन थांबलेली असताना मोजणी केली असता १० जवान बेपत्ता असल्याचे लक्षात आले. कमांडरला कुठलीही कल्पना न देता बर्धमान ते धनबाद दरम्यान हे १० जवान गायब झाले आहेत.

आम्ही जवान फरार असल्याची तक्रार नोंदवून तपास सुरु केला आहे अशी मुघलसरायचे पोलीस निरिक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी दिली. कमांडरने मुघसरायच्या रेल्वे पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2018 9:55 am

Web Title: from army special train 10 bsf jawan missing
टॅग : Army,Bsf,Kashmir
Next Stories
1 कर्जबाजारी रिक्षा चालकाने दीड लाखांत केला मुलीचा सौदा
2 औरंगजेबने काश्मिरी पंडितांचं धर्मांतर केलं : योगी आदित्यनाथ
3 पासपोर्ट प्रकरण : चुकीची माहिती देणाऱ्या तन्वी सेठचा पासपोर्ट रद्द, ५ हजाराचा दंड
Just Now!
X