पाकिस्तानी सैन्याने भारताच्या सीमेत घुसून केलेल्या भ्याड हल्ल्यात बळी पडलेले भारतीय जवान लान्स नाईक सुधाकर सिंग बघेल यांच्या पार्थिवावर गुरुवारी सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आल़े .
सिधीजवळच्या दरहिरा या त्यांच्या गावी झालेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी सुमारे १० हजार लोक उपस्थित होत़े  सुधाकरचा मोठा भाऊ सत्येंद्र सिंग यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला़
या वेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजय सिंग आणि सिधी जिल्ह्याचे पालक मंत्री नागेंद्र सिंग आदी उपस्थित होत़े
अंत्यसंस्कारांनंतर मुख्यमंत्री चौहान यांनी सुधाकर यांच्या नातेवाईकांना १५ लाख रुपयांची मदत जाहीर केली़  तसेच त्यांच्या विधवा पत्नीला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे, गावात भूखंड देण्याचे आणि सुधाकर यांचे स्मारक गावात उभारण्याचेही आश्वासन या वेळी त्यांनी दिल़े.