01 October 2020

News Flash

जम्मू-काश्मीरच्या ग्रामीण भागात ‘मंगलमूर्ती मोरया’चा गजर!

कठुआ जिल्ह्याातील पाच गावांमध्ये पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सव 

शेखर जोशी 

जम्मू-काश्मीरच्या ग्रामीण भागातील पाच गावांमध्ये यंदा पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. कठुआ जिल्ह्याातील मांडली, बिलावर, फिंतर, डड्डू आणि डडवारा या पाच गावांमध्ये ‘मंगलमूर्ती मोरया’चा गजर झाला. ही सर्व गावे जम्मूपासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असून राज्याचा हा ग्रामीण/दुर्गम भाग आहे. विश्वा हिंदू परिषद आणि जम्मू-काश्मीर अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त पुढाकाराने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. २ सप्टेंबरपासून सुरु झालेला हा सार्वजनिक गणेशोत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत सुरु होता.

विश्वा हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॅप्टन पवन यांनी जम्मू-काश्मीरच्या ग्रामीण भागात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना मांडली आणि या गावातील सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने उत्साहात गणेशोत्सव पार पडला. या पाच गावांपेकी एका गणपतीची प्रतिष्ठापना डडवारा गावातील भारतीय शिक्षण समिती संचालित संत बाल योगेश्वार विद्याा मंदीर शाळेत तर उर्वरित चार गणपतींची प्रतिष्ठापना त्या त्या गावात करण्यात आली होती. यंदाचे पहिलेच वर्ष असल्याने कोणताही देखावा करण्यात आला नव्हता मात्र स्थानिक गावकºयांनी गणपतीभोवती सजावट, आरास केली होती. शाळेत प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीची आरती, पूजा शाळेतील विद्यााथ्र्यांकडून तर अन्य ठिकाणी स्थानिक गावकऱ्यांकडून करण्यात आली.

या सर्व गावकऱ्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाविषयी खूप काही ऐकले होते. पण गणेशोत्सव म्हणजे नेमके काय? ते पाहिले आणि अनुभवले नव्हते. गणेशोत्सव साजरा करायचे ठरले तेव्हा स्थानिक गावकºयांचा प्रतिसाद कसा मिळेल या विषयी थोडी साशंकता होती. मात्र सर्व गावकºयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील प्रत्येक जण घरचा गणपती असल्याप्रमाणे संपूर्ण उत्सवात सहभागी झाला होता, अशी माहिती निवृत्त प्राध्यापक आणि जम्मू-काश्मीर अध्ययन केंद्राच्या ठाणे शाखेचे ज्येष्ठ स्वयंसेवक प्रा. कुमार मंगलम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

जम्मूपासून दूर अंतरावर असलेली ही सर्व गावे दुर्गम अशा ठिकाणी आहेत. स्थानिक गावकऱ्यांच्या सहभागाने गणेशोत्सव साजरा करण्याचा हा अनुभव खूप छान होता. चारही गावांमधील सर्व गावकरी या गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी झाले होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सर्व गावांमधील गणपतींची एकत्र वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पुरुष, मुले, युवकांसह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आता पुढच्या वर्षी या पाच गावांसह अन्य काही गावांमध्येही गणेशोत्सव साजरा करण्याचा आमचा विचार असल्याचेही प्रा. कुमार मंगलम यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीर राज्यात पहिलीपासून संस्कृत
विश्वा हिंदू परिषद, जम्मू-काश्मीर अध्ययन केंद्र, संस्कृत भारती यांच्या सहकार्याने पाचवी ते नववीच्या विद्यााथ्र्यांसाठी जम्मू-काश्मीर मधील शाळांमध्ये शिकवणी वर्ग चालविण्यात येतात. प्रा. कुमार मंगलम हे वर्षातून दोन वेळा जम्मू-काश्मीर येथे तेथील विद्याार्थी आणि शिक्षकांना संस्कृत व इंग्रजी संभाषण कला शिकविण्यासाठी  जातात. उर्दू राजभाषा असलेल्या जम्मू-काश्मीर राज्यात तेथील शाळांमध्ये विद्यााथ्र्यांना पहिल्या इयत्तेपासून संस्कृत विषय  शालेय अभ्यासक्रमात असल्याची माहितीही प्रा. कुमार मंगलम यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 4:00 pm

Web Title: ganesh utsav celebration in jammu and kashmir nck 90
Next Stories
1 अमित शाह यांनी दिला एक देश एक भाषेचा नारा!
2 सैनिकांच्या मृतदेहांची मागणी करत पाक लष्कराने फडकावले पांढरे निशाण
3 सौदीची तेल कंपनी अरामकोवर ड्रोन हल्ला
Just Now!
X