27 May 2019

News Flash

जर्मनी : १७ वर्षाच्या अफगाण मुलाने केला प्रवाशांवर प्राणघातक हल्ला

अनेकांना जखमी केल्यानंतर या मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी पाठलाग करून या मुलाला गोळ्या झाडून ठार केले.

हल्ल्यानंतर येथील रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने काही काळ बंद करण्यात आला होता.

जर्मनीमध्ये एका अल्पवयीन मुलाने कु-हाड आणि सु-याने  रेल्वे प्रवाशांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. पोलिसांनी या मुलाला ठार केले आहे. पण या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा अफगाणिस्तान नागरिक असून त्याचे वय १७ वर्ष असल्याचे समजते आहे.

सोमवारी रात्री सव्वा नऊच्या आसपास हा प्रकार घडला. व्युर्झबुर्ग स्थानकावर रेल्वे आल्यानंतर हा मुलगा रेल्वेच्या डब्ब्यात शिरला आणि इथल्या प्रवाशांवर  कु-हाड आणि धारधार सु-याने हल्ला करायला सुरूवात केली. अनेकांना जखमी केल्यानंतर या मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु  पोलिसांनी पाठलाग करून या मुलाला गोळ्या झाडून ठार केले.

या हल्लेखोराबद्दल अद्यापही कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. परंतु मरण्यापूर्वी या मुलाने ‘अल्ला हू अकबर’ असा नारा दिल्याचेही  सांगितले जाते. या हल्ल्याचे कारण पोलिसांना कळू शकले नाही. पोलीस  हल्ल्याचा अधिक तपास करत आहेत. या हल्ल्यानंतर येथील रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने काही काळ बंद करण्यात आला होता.

मे महिन्यात २७ वर्षाच्या माथेफिरूने देखील असाच ट्रेनमध्ये धारधार सु-याने प्राणघातक हल्ला केला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता.

First Published on July 19, 2016 12:48 pm

Web Title: germany police kill afghan teenager who attacked train passengers with an axe