मित्रच एका तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न करू लागल्यावर तिने स्वतःला त्या नराधमांपासून वाचविण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. इमारतीच्या खालील रस्त्यावर वाळू असल्यामुळे पीडित तरुणीचा जीव वाचला पण या घटनेत तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हावडामधील लिलुआ भागात ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात तीन तरुणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी पीडित तरुणी आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होती. त्यावेळी तिला सरबतामधून गुंगीचे औषध देण्यात आले. त्या औषधामुळे ती बेशुद्ध होऊ लागल्यावर तिन्ही मित्रांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण अर्धवट शुद्धीत असलेल्या तरुणीला आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल जाणीव होताच तिने प्रतिकार करण्यास सुरुवात केली. आरोपींच्या हातातून सुटका करून घेत ती इमारतीच्या गच्चीवर पोहोचली आणि तेथून तिने थेट खाली उडी मारली. रस्त्यावर वाळू असल्यामुळे तिचा जीव वाचला. या घटनेत तिच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर हावडामधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेबद्दल माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तिन्ही तरुणांना अटक केली असून, त्यांना सोमवारी न्यायालयात आणण्यात येणार आहे. तिन्ही तरुणांविरोधात शारीरिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2016 रोजी प्रकाशित
बलात्कार टाळण्यासाठी तिने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी
हावडामधील लिलुआ भागात ही घटना घडली.
Written by वृत्तसंस्था
Updated:

First published on: 07-03-2016 at 12:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl jumps from second floor of a building to escape rape attempt