20 September 2020

News Flash

मध्य प्रदेशात तलवारीने युवतीची निर्घृण हत्या

बारावीतील विद्यार्थिनीची ( वय १७) तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.

| February 24, 2018 03:20 am

प्रतिकात्मक छायाचित्र

मध्य प्रदेशातील कोटमा शहरात शाळेच्या परीसरात बारावीतील विद्यार्थिनीची ( वय १७) तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ती परीक्षेसाठी जात असताना गुरुवारी ही घटना घडली. काही दिवसांपासून एक व्यक्ती तिचा पाठलाग करीत होती. गुरुवारीही त्याने तिचा पाठलाग केला. ही युवती शाळेजवळ पोहोचताच त्याने तिच्या मानेवर तलवारीने तीन-चार वार केले त्यामध्ये युवती जागीच ठार झाली, असे पोलीस अधीक्षक सुनील जैन यांनी सांगितले. शाळेतील एक शिक्षक या धक्कादायक घटनेचा साक्षीदार असून त्याने आरडाओरड करताच हल्लेखोर रक्ताने माखलेली तलवार टाकून तेथून पसार झाला. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

केरळमध्ये आदिवासी इसमाचा बेदम मारहाणीत मृत्यू

पलक्कड : येथील आगली परिसरातील काही दुकानांमधून वस्तू चोरल्याच्या संशयावरून स्थानिकांनी केलेल्या बेदम मारहाणीत ३५ वर्षांच्या आदिवासी इसमाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत आदिवासीचे नांव मधू असे असून तो मनोरुग्ण असल्याचा संशय आहे. काही महिन्यांपासून तो मुक्कलीजवळच्या जंगलात राहात होता आणि या परिसरात हिंडताना दिसत होता. शहरातील दुकानांमधून काही वस्तू चोरल्याचा आरोप करून स्थानिकांनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. हात बांधलेल्या अवस्थेतील मधूसमवेत काही जण सेल्फी घेत असल्याची फीतही व्हायरल झाली होती. पोलिसांनी तातडीने त्याला  रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र जीपमध्ये मरण पावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 3:20 am

Web Title: girl student brutally murdered outside school in madhya pradesh
Next Stories
1 जनतेच्या पैशांची लूट सहन केली जाणार नाही; पीएनबी घोटाळ्यावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2 योगासनांमुळे मोदी पंतप्रधान होत असतील तर राहुल गांधींनीही ते करावे : बाबा रामदेव
3 राज्यसभेच्या ५८ जागांसाठी निवडणुकीची घोषणा; २३ मार्चला होणार मतदान
Just Now!
X