News Flash

सिगरेट चोरली म्हणून कूकने मित्राला भोसकले…

हे दोघे सुटीची मजा लुटण्यासाठी गोव्यात आले होते.

प्रातिनिधिक छायाचित्र.

सिगरेट चोरली म्हणून एका आचाऱ्याने मित्राला भोसकल्याचा प्रकार गोव्यातील बागा परिसरात एका रिसॉर्टमध्ये घडला. आपल्याकडील सिगरेट चोरली या कारणावरून आचाऱ्याने आपल्या मित्राचा चाकू खुपसून खून करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने दिलेल्या कबुलीजबाबात त्याने हे कारण सांगिलते आहे.

पश्चिम बंगालच्या दक्षिण दीनजपूर येथील २१ वर्षीय तरुण सैफुल सरकार हा आपल्या नेपाळी मित्रासोबत गोव्यातील बागा रिसॉर्टमध्ये आला होता. आपल्या कार्यालयीन सहकाऱ्यांबरोबर गोव्यात सुटीची मजा लुटण्यासाठी आलेल्या या दोघांपैकी ग्यान बहादुर याने सैफुलची सिगरेट चोरली. या कारणावरून सैफुलला ज्ञान बहादूरचा प्रचंड राग आला. त्याने हा राग मनात धरून ठेवत ज्ञान बहादूरच्या चाकू खुपसला आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

ही घटना घडल्यानंतर सैफुल रिसॉटवरून पसार झाला. काही वेळाने त्यांच्या सहकाऱ्यांपैकी एकाला ग्यान बहादुर जखमी अवस्थेत सापडला. त्याने लगेच पोलिसांना माहिती देत ग्यान बहादुरला नजीकच्या गोवा मेडिकल रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर कलंगुट पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना काही दुवे सापडले. तसेच काही प्रत्यक्षदर्शींचेही जबाब नोंदवण्यात आले.

याच्या आधारावर आणि एका प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने पुढील चार तासात आरोपी सैफुल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पसार झालेला सैफुल रात्रीच्या विमानानेच फरार होण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी त्याला वेळेत पकडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2018 6:40 am

Web Title: goa cigarette theft cook stabbed friend in resort
टॅग : Goa
Next Stories
1 ‘द्रमुक’ प्रमुख करुणानिधी कावेरी रुग्णालयात दाखल; समर्थकांची गर्दी
2 पुतिन-मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा
3 विकासदर जास्त असूनही भारत सुख निर्देशांकात खालीच
Just Now!
X