ईएसआयसी ( कर्मचारी राज्य विमा निगम) सुविधा प्राप्त असलेल्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ही सुविधा ज्या कर्मचाऱ्यांना लागू होते अशांना आता सुपर स्पेशलिटी रूग्णालायात उपचार घेण्यासाठी सहा महिने वाट पाहावी लागणार नाही. ईएसआयसी सदस्य बनल्याच्या पहिल्यादिवसापासूनच हे कर्मचारी व त्यांच्यावर अबलंबून असलेल्यांना आता सुपर स्पेशलिटी रूग्णालयात उपचार घेता येणार आहे. उच्च न्यायालयाने बुधावारी यासंदर्भात आदेश दिले आहेत.

न्यायाधीश मनमोहन यांनी ईएसआयसीच्या त्या अटी फेटाळून लावल्या, ज्यानुसार विमाधारक व त्यांच्या अवलंबितांना सुपर स्पेशलिटी रूग्णालयात उपचारासाठी क्रमशः सहा महिने ते एक वर्षांपर्यंत वाट पहावी लागत होती. मात्र आता या निर्णयामुळे जवळपास १२ कोटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

ईएसआयसीकडून युक्तीवाद करण्यात आला होता की, या अटी यासाठी घालण्यात आल्या आहेत की कोणीही या सुविधेचा दुरूपयोग करू नये. उच्च न्यायालयाने गंभीर आजाराने पिडीत दोन मुलांसंदर्भातील याचिकेवरील सुनावनी वेळी म्हटले की, सर्व बाबी पडताळून पाहिल्यावर हे स्पष्ट होतो की, ईएसआयने देखील कधी दुरूपयोगाची तपासणी केलेली नाही. या अगोदर न्यायालयाने १० लाखांपेक्षा अधिकचा खर्च न करण्याची मर्यादा संपुष्टात आणली होती. तसेच, दुर्लभ आणि अनुवंशीक आजारांनी ग्रस्त रूग्णांना निशुल्क उपचार देण्यासाठी बनवल्या गेलेली योजना रद्द केल्याबद्दल उच्च न्यायायलयाने सरकावर ताशेरे ओढले. न्यायालयाने हे स्पष्ट केले की अशा रूग्णांवर निशुल्क उपचार झाला पाहिजे, सरकार हे नाकारू शकत नाही.