कार्यालयीन कामांसाठी ज्या व्हिडिओ कॉन्फरन्सेस होत असतात, त्यासाठी गुगलने क्रोमबॉक्स ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गुगलच्या उत्पादन व्यवस्थापन विभागाचे सीझर सेनगुप्ता यांनी सांगितले, की आताच्या काळात आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वेगवेगळय़ा वेळा असलेल्या ठिकाणांच्या लोकांशी संपर्कात राहू शकतो. कार्यालयांनी कामासाठी समोरासमोर व्यक्तींनी बैठकीत सहभागी होणे आवश्यक असते. त्यात अधिकारी व्यक्तींचा सहभागही असतो.
गुगलने आता त्यासाठी क्रोमबॉक्स ही सुविधा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी उपलब्ध करून दिली असून त्याची किंमत ९९९ डॉलर आहे. नंतरच्या काळात ही सुविधा ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा, जपान, न्यूझीलंड व स्पेन या देशांत उपलब्ध करून दिली जाईल.
या क्रोमबॉक्समध्ये हाय डेफिनेशन कॅमेरा, स्पीकर व मायक्रोफोन हे घटक आहेत. त्यात एक पडदाही दिलेला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेटअपसाठी व्यवस्थापन शुल्क २५० डॉलर इतके आहे.
क्रोमबॉक्स व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये एका वेळी १५ जण सहभागी होऊ शकतात. त्यात स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप व इंटरनेट जोडणी असलेल्या संगणकांचा वापर करता येतो.
गुगल सध्या त्यांना उद्योग ऑनलाइन सर्चच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. उत्पादननिर्मिती व सहकार्य या दिशेनेही कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. इंटरनेट क्लाऊड सुविधाही दिली जात आहे.
कॅलिफोर्निया टेक्नॉलॉजी कंपनीने क्रोमबॉक्स व गुगल डेटा सेंटरचे सव्‍‌र्हर संगणनासाठी वापरण्याकरिताचे तंत्रज्ञान विकसित करण्यात मदत केली होती. गुगलने पहिले क्रोमबुक २०१० मध्ये आणले व मायक्रोसॉफ्टच्या विंडोज सॉफ्टवेअरला आव्हान दिले होते.