करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सध्या लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांना दैनंदिन अत्यावश्यक सेवा-सुविधा मिळवण्यासाठी घराबाहेर पडता येत नाही. ही समस्या लक्षात जर कोणाला औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडता येत नसेल तर त्यांना आता घरपोच औषधं पुरवली जाणार आहेत. केंद्र सरकारनं औषध कंपन्यांना तशी परवागनी दिली आहे.

आणखी वाचा- Lokcdown मुळे करोनावर प्रभावी ठरणारे ‘ते’ औषध बनवण्यात विलंब

अशा प्रकारे औषधांची होम डिलिव्हरीसाठीची अधिसूचना लवकरच राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.