मुंबईतील १९९३च्या बाँबस्फोट मालिकेतील आरोपी याकूब मेमन याच्या कुटुंबीयांना त्याला भेटीची परवानगी देऊन त्याच्या फाशीचे प्रकरण सरकारने दयाळूपणे हाताळले आणि यामुळेच फाशीनंतर शांतता कायम राहिली, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे.
लोकशाहीत जसे वागायला हवे, तसेच सरकार वागले. मेमनचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय नागपुरात हजर असतील हे सरकारने निश्चित केले, तसेच त्याच्या अंत्यसंस्कारात भाग घेण्याची परवानगी दिली. यातून भारतीयत्वाची मूल्ये व नीतिनियम दिसून आले, असे संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार म्हणाले. या फाशीमुळे काही तरी घटना घडेल असे वातावरण देशात होते. सरकारने न्यायालयीन निर्णयानंतरची परिस्थिती हाताळताना भारतीयत्वाचे मूळ तत्त्वाचे पालन केले आहे,असे इंद्रेश कुमार यांनी स्पष्ट केले.