News Flash

संसदेतील जीएसटी विशेष सोहळ्यावर काँग्रेसचा बहिष्कार

काँग्रेस जीएसटीच्या विशेष अधिवेशनात सहभागी होणार नाही

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

स्वातंत्र्यानंतरची पहिली कर सुधारणा अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकार उत्साही असतानाच काँग्रेसने मात्र जीएसटीच्या विशेष सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेस जीएसटीसाठीच्या विशेष अधिवेशनात सहभागी होणार नाही असे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

वस्तू व सेवा कराच्या रूपात १ जुलैपासून देशभरात एक कर रचना अस्तित्वात येणार असून पूर्वसंध्येला तिच्या मुहूर्तासाठीची तयारीही करण्यात आली आहे. संसदेच्या वर्तुळाकार मध्यवर्ती सभागृहात यानिमित्ताने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रपती, उप राष्ट्रपती, पंतप्रधान, काही माजी पंतप्रधान, लोकसभा, राज्यसभेचे अध्यक्ष तसेच अनेक ज्येष्ठ नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ५० वर्षांपूर्वी याच ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य सोहळा साजरा झाला होता.

जीएसटीच्या विशेष अधिवेशनात काँग्रेस सहभागी होणार की नाही याविषयावर गुरुवारी पक्ष नेत्यांची चर्चा झाली. या चर्चेअंती काँग्रेसने अधिवेशनात सहभागी न होण्याचे ठरले. यापूर्वी तृणमूल काँग्रेसनेही या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता जीएसटी ही काँग्रेसची संकल्पना असून यावरच पक्षाने बहिष्कार टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 2:18 pm

Web Title: gst rollout congress will not attend gst midnight session on june 30 in parliament sonia gandhi
Next Stories
1 गायीचे नाव घेता आणि हिंसा करता हे कसलं गोरक्षण?-मोदी
2 मुख्यमंत्र्याच्या भाषणादरम्यान पोलीस अधिकारी रमले कँडीक्रशमध्ये
3 CanSat 2017 : भारतीय विद्यार्थ्यांची अभिमानास्पद कामगिरी; जागतिक ‘एअरोस्पेस’ स्पर्धेत अव्वल
Just Now!
X