News Flash

हज यात्रेवर करोनाचे सावट; हज कमिटी ऑफ इंडियाने रद्द केले सर्व अर्ज 

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हज कमिटी ऑफ इंडियाने हज २०२१ साठीचे सर्व अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Hajj Committee of India has rejected the applications of Hajj pilgrims due to Corona
हज यात्रेवर करोनाचे सावट; हज कमिटी ऑफ इंडियाने रद्द केले सर्व अर्ज 

करोनामुळे अनेक धार्मीक कार्यक्रमावर बंदी घालन्यात येत आहे.  करोनामुळे यावर्षीही हज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने हज यात्रा २०२१ चे सर्व अर्ज रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील लोक सर्वात पवित्र आणि महत्त्वपूर्ण हज यात्रेवर जाऊ शकणार नाहीत.

सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने करोना साथीमुळे इतर देशांतून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी हज यात्रेवर बंदी घातली आहे. सौदी अरेबिया केवळ ६० हजार स्थानिक लोकांना कोरोनामुळे हज करण्यास परवानगी देईल.

करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हज कमिटी ऑफ इंडियाने हज २०२१ साठीचे सर्व अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम समाजातील लोकांना आता हजसाठी १ वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 5:42 pm

Web Title: hajj committee of india has rejected the applications of hajj pilgrims due to corona srk 94
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 दिल्ली दंगलः विद्यार्थी कार्यकर्त्यांना दिलासा; कोर्ट म्हणतं, निषेध करण्याचा हक्क आणि दहशतवादी कारवाई…..
2 गाझियाबादमध्ये वृद्ध मुस्लीम व्यक्तीवर झालेल्या हल्ल्यावर, राहुल गांधी म्हणाले…
3 चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरून हटवलं!
Just Now!
X