News Flash

कलम ३७० : …म्हणून बायडेन यांचा विजय वाढवू शकतो भारताची चिंता

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही काश्मीर विषयावर करण्यात आलं भाष्य

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक खूपच चुरसीची झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. मात्र बायडेन यांचा या निवडणुकीमध्ये विजय होणार असं निश्चित मानलं जात आहे. दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरु असून बायडेन हे विजयापासून अवघ्या काही मतांनी दूर आहेत. मात्र बायडेन यांचा विजय झाल्यास ते भारतासाठी थोडे अडचणीचे ठरण्याची शक्यता काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. यामागील मूळ कारण म्हणजे बायडेन यांचं कलम ३७० ला समर्थन असून ते पुन्हा काश्मीरमध्ये लागू करावे अशी मागणी त्यांच्या निवडणूक प्रचारादमरम्यानही झाली होती. त्यामुळेच पाकिस्तानप्रेमी बायडेन राष्ट्राध्यक्ष होणे भारताची चिंता वाढवणारं ठरु शकतं

बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही काश्मीर विषयावरुन भारताच्या भूमिकेविरोधात भाष्य केलं आहे. मुस्लीम अमेरिकन लोकांना आकर्षित करण्यासाठी बायडेन यांच्या निवडणूक प्रचारातील वेगवेगळ्या गटांनी काश्मीरमधील मुस्लिमांची तुलाना बांगलादेशमधील रोहिंग्या आणि चीनमधील उइगर मुस्लिमांशी केली होती. आपल्या प्रचारादम्यान मुस्लीम मतांसाठी बायडेन यांच्या टीमने भारताने रद्द केलेलं कलम ३७० पुन्हा लागू करण्यासंदर्भातही भाष्य करण्यात आलं होतं. बायडन यांच्यासोबत उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यासुद्धा काश्मीर विषयासंदर्भात अमेरिकेने दखल घेतली पाहिजे अशा संदर्भातील वक्तव्य करताना दिसल्या. पाकिस्तानकडूनही अनेकदा काश्मीर प्रश्नी अमेरिकेने लक्ष द्यावे अशी विनंती अमेरिकेकडे करण्यात आलीय.

नक्की पाहा >> पगार, भत्ते, घर, गाड्या, विमान अन्… अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या सुविधा पाहून चक्रावून जाल

पाकिस्तानने दिलाय पुरस्कार

बायडेन यांच्या विजयाची शक्यता अधिक असल्याने पाकिस्तानलाही आता अमेरिकेबरोबरच संबंध सुधारण्याची आशा वाटू लागली आहे. पाकिस्तानला अमेरिकेने आर्थिक मदत करायला हवी असं मत असणाऱ्या मोजक्या अमेरिकन नेत्यांमध्ये बायडेन यांचा समावेश होतो. बायडेन हे आधीपासूनच पाकिस्तान समर्थक नेते आहेत. बायडन यांना ‘हिलाल-ए-पाकिस्‍तान’ या पाकिस्तानमधील दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने २००८ मध्येच सन्मानित करण्यात आलं आहे. बायडेन यांना हा पुरस्कार मिळण्यामागेही एक खास कारण आहे. २००८ साली बायडेन यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच पाकिस्तानला दरवर्षी अडीच बिलियन डॉलरची आर्थिक मदत देण्यास अमेरिकेने सहमती दर्शवली होती. सीनेटमध्ये पाकिस्तानला मदत करण्यासंदर्भातील हा प्रस्ताव बायडेन आणि रिचर्ड लुगर यांनी मांडला होता. तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी ‘कायम पाकिस्तानच्या सोबत उभं राहिल्याबद्दल’ बायडेन यांचे आभार मानले होते. पाकिस्तानी हा दहशतवादाचा फटका बसलेला देश असून त्याला यामधून सावरण्यासाठी आर्थिक मदत केली पाहिजे असं बायडेन यांचं मत आहे.

पाकिस्तानला अपेक्षा आर्थिक दिलाश्याची

पाकिस्तानमधील राजकीय जाणकारांच्या मते बायडेन व्हाइट हाऊसमध्ये गेल्यास कर्जाच्या ओझ्याखाली अडकलेल्या पाकिस्तानला खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बायडन आपल्या परराष्ट्र धोरणांमध्ये पाकिस्तानबरोबरचे संबंध आणखीन सुधारण्यासाठी पुढाकार घेतील अशी अपेक्षा पाकिस्तानी राजकीय तज्ज्ञांना आहे. पाकिस्तानी लष्करामधून निवृत्ता झालेले लेफ्टिनंट जनरल आणि राजकीय विषयांवरील अभ्यास असणाऱ्या तलक मसूद यांनी बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा सुधरतील. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यास त्याचा फायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा आणखीन बळकट करण्यासाठीही होईल असा अंदाज पाकिस्तानी राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 4:26 pm

Web Title: harris and joe biden wont go easy on india over kashmir and article 370 scsg 91
Next Stories
1 US Election 2020: मराठमोळ्या ‘ठाणेदारा’चा अमेरिकेत डंका; ९३ टक्के मतांसह विरोधकांचा धुव्वा उडवत आमदारपदी
2 बायडेन राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानात ‘दिवाळी’; असा होणार फायदा
3 डायलॉग सुनिए डायलॉग; लालूंनी दाखवला नितीश कुमारांचा व्हिडीओ
Just Now!
X