News Flash

‘कॅग’च्या नियुक्तीला आव्हान देणाऱया याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल

नियंत्रक आणि महालेखापरीक्षकपदी (कॅग) शशिकांत शर्मा यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱया दोन जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दाखल करून घेतल्या.

| July 24, 2013 02:38 am

नियंत्रक आणि महालेखापरीक्षकपदी (कॅग) शशिकांत शर्मा यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱया दोन जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दाखल करून घेतल्या. न्यायालयाने केंद्र सरकारला त्यांची बाजू ८ ऑगस्टच्या आत मांडण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश बी. डी. अहमद यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठात याप्रकरणी सुनावणी झाली. केंद्र सरकारला त्यांची बाजू प्रतिज्ञापत्रामधून मांडू देत. या विषयावर सुनावणी होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत ८ ऑगस्टला पुढील सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी आणि ज्येष्ठ विधिज्ञ एम. एल. शर्मा यांच्यासह नऊ मान्यवर व्यक्तींनी याप्रकरणी दोन जनहित याचिका दाखल केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 2:38 am

Web Title: hc agrees to hear pils challenging appointment of cag
टॅग : Cag
Next Stories
1 काश्मिरमध्ये मौलवीच्या घरावरील हल्ल्यात दोन लहानग्यांचा मृत्यू
2 देशातील दारिद्रय़ ३७ टक्क्य़ांवरून २१ टक्क्य़ांवर
3 रामनाथ गोएंका पुरस्कारांचे वितरण
Just Now!
X